ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव मही गावातील निष्क्रिय कनिष्ठ अभियंताची तत्काळ बदली करा

जय शिवसंग्राम संघटनेची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

  देऊळगाव मही गावात 33 के.व्ही. सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या देऊळगाव मही गावात. निष्क्रिय कनिष्ठ अभियंता च्या मनमानी कारभारामुळे देऊळगाव मही गावातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे ,काही दिवसापासून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे गावातील नागरिकांना रात्रीच्या वेळी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

चोरी व डकेतीचे प्रमाण वाढत आहे, या भीतीने गावातील नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे, अशा काम चुकार निष्क्रिय कनिष्ठ अभियंता यांची तत्काळ बदली करण्यात यावी, येणाऱ्या काही दिवसात बदली न झाल्यास जय शिवसंग्राम संघटना च्या वतीने आपल्या कार्यालयात आंदोलन करण्यात येईल. यात कायदा सुव्यवस्था निर्माण झाल्यास उपविभागीय अधिकारी देऊळगाव राजा व कनिष्ठ अभियंता देऊळगाव मही हे जबाबदार राहील.. असा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर. तालुका अध्यक्ष जहीर खान पठाण. शहराध्यक्ष अजमत खान. युवक शहराध्यक्ष शंकर वाघमारे. अनिश शहा. आदिल शेख. राजू शेख. संतोष हिवाळे.सुरेश निकाळजे. अदनान खान. साबीर खान. असलम पठाण. इलीयस शाहा. साहिल शेख. समीर शेख.यांच्या स्वाक्षऱ्या आहेत..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये