गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध दारू वाहतूक रेड कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक 26.02.2024 रोजी CIU टीम ने पोस्टे देवळी हद्दीत आंबेडकर नगर ले आऊट परीसर देवळी. प्रो. रेड करून एकूण 8,80,000/-रु. चा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी 1) भिमजय नरेंद्र म्हैसकर वय 40 वर्षे रा. आंबेडकर नगर देवळी.2) मनिष जयस्वाल, (बार मालक) 3) कृष्णा जयस्वाल दोन्ही रा. कलंब जिल्हा. यवतमाल यांना अटक केली आहे.

जप्त मुद्देमाल 1) एक मारुती स्विफ्ट vdi कार क्र MH 34 AM 6031 किँमत 7,00,000/- ₹2) 180 मिली चे प्रीमियम कंपनीचे देशी दारूने भरलेल्या एकूण 25 खाकी रंगाचे खोक्या मध्ये एकूण  1200 बॉटल किँमत 1,80,000/-₹ असा एकूण 8,80,000/-₹ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर माल हा मौजा कळंब जि. यवतमाळ येथील मनीष जयस्वाल याच्या दारूचे दुकानातून किष्णा जयस्वाल याने दिलेला आहे.

गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल पो. स्टे. देवळी चे स्टाफ चे ताब्यात देण्यात आले.

 सदर कारवाई पथक पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्था.गु.शा. यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश भोयर, पो. हवा. रोशन निंबोळकर, ना.पो.अं. सागर भोसले, पो. अंम. अभिजित गावंडे, संदिप गावंडे, केलास वालदे, प्रदीप कूचनकर, सर्व विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा तसेच चालक पो.अ. शुभम बहादुरे, पो.मु. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये