इंदिरा गांधी महिला महाविद्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा

चांदा ब्लास्ट
ताज बहुउद्देशीय संस्थेद्वारे संचालित इंदिरा गांधी महिला महाविद्यालय, घुग्घूस येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. शहनाज अजिजखान पठान मॅडम यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थित राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.
ध्वजवंदना नंतर राष्ट्रीय सेवा योजने मध्ये उत्कृष्ठ कामगीरी केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बीए व बी कॉम च्या विद्यार्थीनिनी देशभक्तीपर गीते, भाषणे, नृत्य आणि कविता सादर करून उपस्थितांमध्ये राष्ट्रवादाची भावणा जागवली. विद्यार्थिनिना संबोधित करतांना आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. शहनाज पठान मॅडम यांनी देशाच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा संविधानामुळे आपला देश कसा एक महान प्रजासत्ताक बनला आहे व धर्मनिरपेक्षता लोकशाहीला कसे मजबुत ठेवते याबद्दल ची माहिती दिली.
प्रस्तुत कार्यक्रमाला घुग्घुस येथित प्रतिष्ठीत मान्यवर, महाविद्यालयाचे विश्वस्त, सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थिनी मोठ्या संख्याने उपस्थित होत्या.