ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय येथे पार पडला तीन दिवसीय वसंतोत्सव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर, महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर, महात्मा गांधी विद्यामंदिर व महात्मा गांधी स्कॉलर्स अकॅडेमी, गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २६ जानेवारी दरम्यान ‘वसंतोत्सव – २०२५’ वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे उपस्थित होते. उद्घाटन नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून अल्ट्राटेक सिमेंट, गडचांदूर माणिकगड युनिटचे मानव व संसाधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मुकेश गहलोत, गोंडवाना विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूरचे प्राचार्य तथा संस्थेचे संचालक डॉ. अनिल चिताडे, उपाध्यक्ष विठ्ठलराव थिपे, विकास भोजेकर, सचिव धनंजय गोरे, सहसचिव उज्वला धोटे, संचालक रामचंद्र सोनपितरे, पुष्पाताई हिरादेवे, प्राचार्य शैलेंद्र देव, प्राचार्य साईनाथ मेश्राम, प्राचार्या किरण कुंडू, उपप्राचार्य प्रफुल्ल माहूरे, पर्यवेक्षिका लता घाटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

हस्तलिखित प्रकाशन, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, सांस्कृतिक रजनी, एकल नृत्य, वाद्यवादन, वादविवाद, प्रश्नमंजुषा, कराओके अशा वेगवेगळ्या स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या. ध्वजारोहण संस्थेचे सचिव धनंजय गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

       कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये