ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स च्या पटांगणामध्ये दिनांक 21 जून 2023 रोज बुधवार ला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात योग दिनाच्या कार्यक्रमाला हजर होते याप्रसंगी प्राचार्य डॉ. देव यांनी योग दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. महाविद्यालयातील शारीरिक शिक्षक डॉ.अनिस खान यांनी सांगितले की दररोजच्या योगाभ्यासातून शारीरिक तसेच मानसिक संतुलन राखण्याचे कार्य केले जाते त्यामुळे योगाच्या नियमाचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पालन होणे फार आवश्यक आहे. याप्रसंगी शरीराच्या व्यायामाबरोबर मनाचा व्यायाम कसा राखला जाईल यासाठी या कार्यक्रमातून प्रयत्न केले गेले. या कार्यक्रमांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिता चिताडे , शारीरिक शिक्षक. बबन भोयर 9इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी योग कार्यक्रमांमध्ये विविध प्रकारचे प्राणायाम व योग क्रिया महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षकांनी विस्ताराने समजून सांगितल्या. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील प्रा. रामकृष्ण पटले, प्रा.पवन चटारे,प्रा. चेतन वानखेडे. प्रा. मनोहर बांद्रे, डॉ.अजय कुमार शर्मा,प्रा.चेतन वैद्य तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात हजर होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये