खा. धानोरकर यांच्या हस्ते 75 फूट उंचीच्या ध्वजाचे ध्वजारोहण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते शहरातील सेवादलाच्या मैदानात प्रजासत्ताक दिनानिमित्त ७५ फूट उंचीच्या तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळकी, अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते. शहरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिनाचे औचित साधत शहरातील विविध शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळकी, हुतात्मा स्मारक येथे उपमुख्य अधिकारी विजयकुमार जांभुळकर, तहसील कार्यालयात तहसीलदार राजेश भांडारकर, वनपरिक्षेत्र कार्यालयात वनपरीक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे तर पोलीस स्टेशन मैदानात ठाणेदार अमोल काचोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील शाळा तथा महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहरातील नागरिकांनी एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.