डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तहसील कार्यालय वर्धा येथे साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
तहसील कार्यालय वर्धा येथे व भारत देशाचे संविधान लिहणारे भारतरत्न डॉ बाबासाहेब रामजी आंबेडकर यांची 134 वी जयंती तहसील कार्यालय वर्धा येथे साजरी करण्यात आली आहे.
यावेळी वर्धा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार संदिप दाबेराव व डॉ शकुंतला पाराजे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब रामजी आंबेडकर यांच्या फोटोला मालाअर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले कर्मचारी संदिप दाबेराव नायब तहसीलदार डॉ शकुंतला पाराजे नायब तहसीलदार रंजना तडस सहा.म.अधिकारी.योगिता गाडगे सहा.म.अधिकारी.अनंता राऊत सहा.म.अधिकारी नितीन मेश्राम महसूल सहाय्यक धिरज कांबळे महसूल सहाय्यक सचिन ताकसांडे चंदू कावळे शिपाई उपविभागीय कार्यालय वर्धा आणि तहसील कार्यालय वर्धा येथील सर्व अधिकारी व कर्मचारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 जयंती करीता उपस्थित होते अशा प्रकारे जयंती साजरी करण्यात आली आहे.