मांगलहिरा काॅग्रेस ग्रा.पं.सदस्यांचा शेतकरी संघटनेत प्रवेश
कार्यक्रमाला मोठ्या संख्येंने युवक, महिला व गावकरी उपस्थित होते.

चांदा ब्लास्ट
शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत आणि शेतकऱ्यांच्या घामाच्या दामासाठी अहर्निश संषर्ष करीत त्यासाठी लढा उभारणा-या शेतकरी संघटनेच्या कार्यप्रणाली वर निष्ठा दर्शवित कोरपना तालुक्यातील मांगलहिरा ग्रामपंचायतचे सदस्य भिमराव लक्ष्मण कोडापे आणि ग्रामपंचायत सदस्य मिराबाई दौलत आत्राम यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करीत शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमात संघटनेचा बिल्ला लावून व पुष्पगुच्छ देऊन ॲड.वामनराव चटप यांनी त्यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील नवले, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी जि.प. समाजकल्याण सभापती निळकंठराव कोरांगे, रमाकांत मालेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील बावणे, तालुकाध्यक्ष ॲड. श्रीनिवास मुसळे, अनंता गोडे, भारत गौरी, उत्तम गेडाम यांचेसह मोठ्या संख्येंने युवक, महिला व गावकरी उपस्थित होते.