ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहरातील गायकांनी धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त धम्म गीतांची केली बरसात 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 गीत संगीत करा ओके टीमच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिनाचे निमित्त साधून दिनांक 13 ऑक्टोबर 24 रोजी सायंकाळी चिखली रोडवरील नगर परिषद च्या अभ्यासिका परिसरात धम्म गीत गायनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास या परिसरातील श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर गायक कविता खरात, संतोष कासारे, विष्णूभाऊ झोरे, ओम कासारे, राहुल खांडेभराड,सुधीर हिवाळे, यांनी उपस्थितावर धम्मगीतांचा वर्षाव करून संपूर्ण वातावरण भक्तीमय करून टाकले गायक मंडळींचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थीत श्रोते सुद्धा त्यांना दाद देत होते.

भीम गीतामधून देशवासीयांना यापूर्वी जो संदेश देण्यात आला होता त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी गीत गाऊन करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी गीत संगीत कराओके टीमच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. बौद्ध विहार परिसरातील उपासिका यांचे वतिने सर्व गायक मंडळींचा सन्मान करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये