ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना तालुक्याचा समावेश कोपरा व मानव विकास मिशन उपक्रमात करा – आबीद अली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

चंद्रपूर जिल्ह्यातील अकरा तालुक्याचा समावेश यापूर्वी मानव विकास मिशन या कार्यक्रमात आहे चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगराळ आदिवासी बहुलक्षेत्र म्हणून कोरपणा तालुक्याची ओळख आहे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आत्महत्याची पाळी ओढावल्याच्या नोंदी आहेत तर नदीपट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांना पूर पाण्याचा तडाका बसून मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागतो आर्थिक निर्देशांकाच्या आधारावर तालुक्याची निवड केली असली कोरपणा तालुका एकीकडे सिमेंट कोळसा उद्योगांमध्ये अग्रेसर असला तरी स्थानिक लोकांना विशेषतः शेतकरी व कामगारांना लाभ होत नाही अनेक शेतकऱ्यांना कर्ज बाजाराचा डोंगर डोक्यावर उभा असून विकास कामांमध्ये व शेतीची प्रगती साध्य करण्यामध्ये आर्थिक चनचनकारणीभूत आहेभागात धो धो पाऊस पडत असला तरीसिंचनाच्या सुविधांचा अभाव आहे या ठिकाणी अमल नाला व पकडी गड्डम ही दोन जलाशय सिंचनासाठी म्हणून उभारली असली तरी याचा मोठा फायदा प्राधान्याने सिमेंट उद्योगालाच होत आहे त्यामुळे सिंचनाचे क्षेत्र देखील अल्प असल्याने कोरडवाहू क्षेत्रामध्ये सातत्याने उत्पादन घटत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो महाराष्ट्र शासनाने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी म्हणून कोपरा योजना लागू केली त्याचे परिणाम देखील त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने सकारात्मक आहे चंद्रपूर जिल्ह्याचा भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता दहा तालुक्यांमध्ये धानपट्टा तर पाच तालुक्यामध्ये कापूस मिरची उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे लक्षात प्रभावी क्षेत्रातील चार तालुके आदिवासी बहुल असून मागासलेल्या शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान व शेतीला जोड व्यवसाय उभारणी करण्यासाठी शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील वगळलेल्या चार तालुक्यांमध्ये कोरपना या तालुक्याचा समावेश असून मानवविकास मिशनमध्ये कोरपना तालुक्याचा समावेश करूनशेतकरी अल्पभूधारक अनुसूचित जाती जमाती महिला व युवकांच्या सक्षमीकरणाकरिता व रोजगाराचे संधी उपलब्ध करून देण्यासाठी समावेश कोरपणा तालुक्याचा करण्यात यावा तसेच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये सुरू असलेली कोपरा योजनेचा विस्तार करून शासनाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोपरा योजना लागू करावी अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस विरोधी पक्षनेते अजितदादा पवार विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये