Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

रासेयो शिबीरात गायञी प्रधाने हीचा सत्कार

मुंबई आणि चंदीगड येथे होणाऱ्या शिबिरात सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाचे सुयश*

 मुंबई येथे होणा-या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिनाच्या परेड संचलना करीता राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकामध्यें भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालीत राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सावली येथील बि.एस्सी.द्वितीय वर्गाची विद्यार्थीनी गायत्री संजय प्रधाने हीची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत निवडलेल्या पथकामध्यें निवड झाली आहे.

१७ ते २६ जानेवारी दरम्यान मुंबई येथे होणा-या दहा दिवसीय शिबीरात सदर विद्यार्थीनी सहभागी होणार आहे. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दिनांक ५ ते ११ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पंजाब राज्यातील चंदीगड येेथे होणा-या राष्ट्रीय एकात्मता शिबीरा करीता गायत्री संजय प्रधाने हीची निवड झाली आहे. राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथक संचलन आणि चंदीगड येथे होणा-या राष्ट्रीय एकात्मता शिबीराकरीता निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने गायत्री प्रधाने हीचा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कवठी येथे पार पडत असलेल्या शिबीरात संस्थेचे उपाध्यक्ष अनिल स्वामी, कोषाध्यक्ष डाॅ. विजयराव शेंडे आणि प्राचार्य डाॅ. चंद्रमौली यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी कवठी ग्राम पंचायतीचे पदाधिकारी,महाविद्यालयाचे शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठया संख्येनी उपस्थित होते.निवड झालेल्या विद्यार्थिनीचे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.रामचंद्र वासेकर,डॉ.मार्कडेवार तसेच प्राध्यापक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये