ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

आईआईएम नागपूरच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील बचतगटांच्या महिलांना प्रशिक्षण

नागपूर येथे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 नागपूर येथील भारतीय प्रबंधन संस्था (IIM) येथे वर्धा जिल्ह्यातील बचतगटांच्या महिलांना व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंग व ब्रांडीग या बाबतचे दोन दिवसीय प्रशिक्षण दि १४ व १५ जून २०२३ या कालावधीत देण्यात आले. वर्धा जिल्ह्यात जवळपास १४००० महिला बचतगट कार्यरत आहेत. प्रत्येक महिला बचतगटामार्फत वेगवेगळ्या पदार्थांचे उत्पादन करण्यात येते, त्यामध्ये खाद्यपदार्थ, घरगुती वापराच्या वस्तू उन्हाळी खाद्यपदार्थ, विविध सेंदीय उत्पादने घेतली जातात. यामध्ये १०० पेक्षा जास्त वस्तूंचे उत्पादन समाविष्ट आहे, त्यापैकी अनेक वस्तू अँमेझोन, फ्लिपकाट या सारख्या मोठ्या ई-कॉमर्स कम्पनीच्या माध्यमातून सुद्धा विविध वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.

बचतगटांमार्फत उत्पादित केलेल्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात बाजारांमध्ये मागणी मिळावी व त्याचबरोबर वस्तूंची जाहिरात जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवण्याकरिता आवश्यक कौशल्य अवगत असणे आवश्यक आहे, त्याकरिता या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद, वर्धा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, वर्धा, जिल्हा मिशन मॅनेजमेंट, वर्धा यांच्या संयुक्त पुढाकाराने भारतीय प्रबंधन संस्था, नागपूर येथे करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन श्री. रोहन घुगे, (भा.प्र.से), मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. वर्धा यांनी केले. या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून IIM, नागपूरचे प्रा. मुकुंद व्यास, प्रा. गुंजन तोमर, प्रा. निकुज जैन, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, वर्धाचे श्री. विश्वास सिद, MSRLM च्या वतीने स्वाती वानखेडे व मनीष कावडे, रुपेश रामगडे, MGNF उपस्थित होते.

उद्घाटनपर मार्गदर्शन करताना बचतगटातील महिलांना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी या प्रशिक्षणाचा पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि उत्तम मार्केटिंग तंत्र आत्मसात करावे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले. त्यानंतर प्रा. मुकुंद व्यास यांनी उपस्थित महिलांना IIM नागपूरच्या वतीने योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासंबंधी आश्वासन दिले तसेच महिलांनी त्यांना येत असलेल्या अडचणींचे निरसन संबंधित प्रशिक्षकाकडून करून घेण्याबाबत सूचित केले. या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात पहिल्या दिवशी दि १४ जून रोजी सकाळच्या सत्रात प्रा.गुंजन तोमर यांनी महिलांनी आपल्या व्यवसायाचे उत्तम प्रकारे व्यवस्थापन कसे करावे? या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. दुपारच्या पहिल्या सत्रामध्ये प्रा.रंजिता यांनी उत्पादित वस्तूंचे पॅकेजिंग आणि मार्केटिंग प्रभावीपणे कसे करावे? या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. दुपारच्या द्वितीय सत्रात प्रा. निकुंज जैन यांनी आपल्या व्यवसायाची पुरवठा साखळी (सप्लाय चेन मॅनेजमेंट चे तंत्र) निर्माण करून प्रभावी पद्धतीने कसे राबवावे? या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

दुसऱ्या दिवशी दि १५ जून रोजीच्या सकाळच्या सत्रात प्रा. गुंजन तोमर यांनी आपल्या वस्तूंच्या मार्केटिंग साठी सोशल मिडिया च्या माध्यमातून प्रभावीपणे उपयोग कसा करावा ? या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात प्रा. मोनिका ढोचक यांनी व्यवसायाचे उत्तम आर्थिक नियोजन बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अश्या पद्धतीने प्रशिक्षण शिबिराची सांगता दि १५ जून रोजी संपन्न होऊन उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प,वर्धा व इतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये