Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

डोलारा येथील गोवंश कत्तलखाना तात्काळ बंद करा

गोरक्षण समितीच्या सचिवाला काठीने मारहाण : पत्रकार परिषदेत माहिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        हिंदू धर्मातील प्रत्येकासाठी गोवंश देवरुपी आस्तेची बाब आहे या भद्रावती येथील डोलारा तलाव परिसरात गोवंश् कत्तलखाना मागील बऱ्याच दिवसापासून सुरू आहे याकरता प्रशासनाला गोरक्षण समितीकडून वारंवार सूचना सुद्धा केल्या मात्र अजूनही तो बंद करण्यात आला नाही हा गोवंश कत्तलखाना तात्काळ बंद करण्याबाबत प्रशासनाला तहसीलदारा मार्फत निवेदन देण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

डोलारा तलाव परिसरात बुधवार, शुक्रवार व रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणात गोवंशाची हत्या करून मास विक्री केल्या जाते हे गैरकायदेशीर प्रकार गेल्या कित्येक दिवसापासून सुरू आहे मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे सदर परिसरात सुरू असलेले कत्तलखाने बंद करण्यात यावे अन्यथा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कडून निषेध मोर्चा काढण्यात येईल या याबाबतचे निवेदन प्रशासनाला तहसीलदार व ठाणेदारा मार्फत देण्यात आल्याचे पत्रकारांत परिषद माहिती दिली यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पामपट्टीवार , गोरक्षण समितीचे सदस्य पवन हूरकर, शुभम दातारकर, अर्जुन लांजेकर, विक्रांत बिसेन, विशाल दाते, सुरज पेंदाम, चेतन शेंडे, सचिन बावणे, गोपाल पारोधे, शुभम दाणी, वैभव आसेकर आधी उपस्थित होते.

[अमोल काचोरे ठाणेदार भद्रावती

               भद्रावती पोलिसांनी दीड वर्षांपूर्वी डोलारा भागातील कत्तल खान्यावर मोठी कारवाई केली होती तेव्हापासूनच हा प्रकार बंद आहे त्यानंतर ही पोलिसांची सर्च मोहीम या परिसरात सुरू आहे तरीसुद्धा गोवंश कत्तलखान्याबाबत पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी आम्ही कारवाई करू.]

[गोरक्षण समितीच्या सचिवाला काठीने मारहाण ]

            राधाकृष्ण गोरक्षण समिती गवराळा येथील चराई क्षेत्रामध्ये येथीलच गुराख्याने आपली जनावरे चराईसाठी सोडले यावरून गोरक्षण समितीच्या सचिवाने या गुराख्याला हटकले असता त्यांनी त्या सचिवाला काठीने मारहाण करून जीवे मारायची धमकी दिली या घटनेची तक्रार दिनांक २ जानेवारीला भद्रावती पोलिसात दिली असून त्या गुराख्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.

बंडू येरमे राहणार गवराळा असे आरोपी गुराख्याचे नाव आहे तर चेतन शंकर शेंडे असे फिर्यादीचे नाव आहे फिर्यादी चेतन हे राधाकृष्ण गोरक्षण समिती येते गेल्या एका वर्षापासून सचिव म्हणून काम करत आहे येथे वीस जनावर असून त्यांना चराईसाठी सुशील अवतरे यांचे शेत भाडेतत्त्वावर घेतले आहे याच भागाच्या परिसरात बंडू येरमे हे आपले जनावरे घेऊन येत होते त्यांचे सोबत भद्रावती परिसरातील कसायाशी संबंध असून ते जनावरे पाहण्यासाठी या भागात येत होते घटनेच्या दिवशी बंडू येरमे यांनी आपली जनावरे गोरक्षण समितीच्या चराई क्षेत्रात टाकली त्यामुळे त्याला या प्रकाराबाबत हटकले मात्र त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन मला काठीने मारहाण केली हा प्रकार होत असताना ११२ क्रमांक फोन केला असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात दिली असून आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे घटनेचा पुढील तपास ठाणेदार अमोल काचोरे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये