Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील शिवाजी नगर येथे 26 वर्षीय युवकाने त्याचे राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 24 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता घडली.

सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी, सुभाष दादाराव साबळे त्यांचे दोन मुले व पत्नी सकाळी दहा वाजता बाहेर कामाला गेलेले होते. तेव्हा मुलगा मृतक संदिप सुभाष साबळे वय 26 वर्ष हा एकटाच घरी होता. त्यानंतर दुपारी 01/30 वा फिर्यादी यांची पत्नी सौ.गिता साबळे या मेसवरुन कामे संपवुन आपले परत आपले घरी गेल्या असता त्यांना आपले घराचां दरवाजा बंद दिसला म्हणुन त्यांना घराचा दरवाजा जोरात लोटून उघडला असता त्यांना त्यांचा मुलगा संदिप सुभाष साबळे वय 26 वर्ष हा घरातील लाकडी बल्लीला दोरीने गळफास घेवुन मरण पावलेला दिसला.

पोलिसांना माहिती मिळताच घटणास्थळी येऊन पंचनामा केला ,मर्ग दाखल करुन पुढील तपास पोलीस निरिक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नारायण गिते करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये