ताज्या घडामोडी

निर्घुण हत्येने खळबळ – भर दुपारी युवकाची हत्या

दोन्ही हल्लेखोर फरार पोलिस तपास जारी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा तालुका मुख्यालयापासून अवघ्या पाच ते सहा किमी अंतरावर असलेल्या सास्ती येथे भर दुपारी अज्ञात युवकांनी केलेल्या हल्ल्यात युवकाचा बळी गेल्याने खळबळ उडाली असुन राजुरा पोलिस गुन्हेगारांचा शोध घेत आहे.

सविस्तर वृत्त असे की वेकोली खाणीमुळे समृद्ध असलेल्या सास्ती येथिल चन्ने ह्यांच्या दारूच्या दुकानाजवळ आतिश मोतकू नामक युवक आपल्या मित्रासह बोलत असताना अचानक दोन हल्लेखोरांनी घटनास्थळी येऊन त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. अनपेक्षितपणे झालेल्या हल्ल्यामुळे आतिश ह्याला बचावाची संधी मिळाली नाही व तो जागीच गतप्राण झाला.

घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना वर्दी दिली. सदर हत्याकांड जुन्या वैमनस्यातून झाले असल्याची चर्चा असुन आरोपींनी हत्या करून तत्काळ पळ काढला. हत्येची माहिती कळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळ गाठुन मोका पंचनामा केला असुन सदर युवकाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे रवाना केला आहे.

भर दुपारी वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या ह्या हत्याकांडाने नागरिकांत भीतीचे वातावरण असुन राजुरा पोलिस तांत्रिक पद्धतीने आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये