Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सोमनाथ सुर्यवंशीना मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा

अखिल भारतीय मादगी समाज संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

अखिल भारतीय मादगी समाज संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमनाथ सुर्यवंशी यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केल्यामुळे 15 डिसेंबरला पोलीस कोठडीत मृत्यु झाला. पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तहसिलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना दि. 17 डिसेंबरला निवेदन देण्यात आले.

 शाहु, फुले, आंबेडकरवादी या पुरोगामी महाराष्ट्रातील परभणी येथे दि.10 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील शिल्पातील संविधाच्या प्रतीची विटंबना झाली या घटनेचा निषेध करण्यात आला. आंदोलनानंतर पोलीस यंत्रणेने परभणीतील कोंबींग ऑपरेशनच्या नावाखाली येथील पोलीस प्रशासनाने युवा संविधानप्रेमी वकीलीचा विद्यार्थी सोमनाथ सुर्यवंशी यांच्यासह एकुण २५ ते ३० विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल केली. त्यांना घरातुन बळजबरीने काढून पोलीस कस्टडीत जबर मारहाण केली. पोलीसांच्या मारहानीमुळे सोमनाथ सुर्यवंशी याचा दिनांकः 15 डिसेंबर रोजी पोलीस कस्टडीमध्येच मृत्यू झाला.

 पोलीसांच्या जबर मारहानीत मृत्यु झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांचे मारेकरी पोलीस निरिक्षक शरद मरे, पोलीस उपनिरीक्षक पुर्नर व एलसीबीचे उपनिरिक्षक घोडबांड यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी. पोलीसांच्या मारहाणीत मृत्यु पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला शासनाकडून ५० लाख रूपयाची आर्थिक मदत देण्यात यावी आणि परभणी शहरातील कोंबीग ऑपरेशन थांबविण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

निवेदन देताना अखिल भारतीय मादगी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रुपचंद लाटेलवार, जिल्हाध्यक्ष अनिल बोटकावार, तालुका अध्यक्ष सुनिल कोरवार तसेच पदाधिकारी उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये