Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भद्रावतीत रोटरी क्लब तर्फे रोटरी उत्सव मेळ्याचे आयोजन

पत्र परिषदेतील माहिती

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

          दरवर्षी दिवाळीत शहरातील तालुका क्रीडा संकुलनात रोटरी क्लब भद्रावतीच्या वतीने रोटरी उत्सव मेळ्याचे आयोजन करण्यात येत असते. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे दिवाळीत या मेळ्याचे आयोजन करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे या रोटरी उत्सव मेळ्याचे आयोजन 20 ते 25 डिसेंबरला स्थानिक तालुका क्रीडा संकुलनात करण्यात येत असल्याची माहिती रोटरी क्लब तर्फे हॉटेल सनी पॉईंट येथे आयोजित एका पत्र परिषदेतून देण्यात आली आहे.

याशिवाय सदर मेळ्यात 5 ते 14 वयोगट तथा 15 वर्षांवरील वयोगट अशा दोन गटात फॅन्सी ड्रेस स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा व संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी स्वागत सेलिब्रेशन सभागृहात 15 व 16 डिसेंबरला ऑडिशन घेण्यात येणार असल्याची माहितीही सदर पत्र परिषदेतून देण्यात आली आहे. पत्र परिषदेला रोटरी क्लब भद्रावतीचे अध्यक्ष किशोर खंडाळकर,माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, प्रा. ज्ञानेश हटवार, प्रवीण महाजन, प्रकाश पिंपळकर, प्रवीण चिमूरकर, हनुमान घोटेकर, आत्माराम देशमुख, विक्रांत बिसेन, सुनील पोटदुखे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये