Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भद्रावतीत एकाच रात्री चार दुकाने फोडली

अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

        शहरातील हायवे परिसरातील तीन व श्रीरामनगर परिसरातील एक अशी चार दुकाने एकाच रात्री अज्ञात चोरट्याने फोडून चोरी केली. सदर घटना दिनांक दोन रोज सोमवारला सकाळी नऊ वाजता उघडकीस आली. सदर दुकानांमधून अंदाजे 60 हजार रुपयांची रोकड चोरी गेल्याची माहिती आहे.

सदर घटनेच्या चौकशीसाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आपली कार्यवाही सुरू केली आहे. वृत्त देईपर्यंत घटनेचा अद्याप गुन्हा दाखल झालेला नव्हता. उडान पूल परिसरातील स्टार पॉईंट बार फोडून अज्ञात चोरट्यांनी बारमधील 23 हजार रुपये रोख व दारूचे दोन बंपर चोरलेळ त्यानंतर जवळच्या देशी दारूच्या दुकानात प्रवेश करून तीन हजार रुपये रोख लांबीले, त्यानंतर एका बिअर शापित प्रवेश केला.

मात्र तिथे काही न भेटल्याने तिथे चोरी केली नाही. त्यानंतर एका ऑटोमोबाईल दुकानात प्रवेश करून दुकानातील 30 ते पस्तीस हजार रुपयाची रक्कम लांबविल्याची माहिती आहे. अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये