Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्र वनरक्षक व वनपाल संघटना न्याय मागण्यासाठी प्रादेशिक कार्यालयासमोर करणार आमरण उपोषण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र वनरक्षक व वनपाल संघटना शाखा बुलढाणा जिल्हा ने न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्य वनसंरक्षक, प्रादेशिक कार्यालय अमरावती येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा उपवनसंरक्षक, बुलडाणा यांना 28 नोव्हेंबर रोजी पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.

वन अधिकारी अभिजित ठाकरे यांच्या विरोधात संघटनेने ठोस पुरावे सादर करून देखील वरिष्ठ अधिकारी निव्वळ बघ्याची भुमिका घेऊन त्यांना पाठीशी घालत असून, सत्यता बाहेर आणणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्या विरोधात षडयंत्र करून लोकशाहीचा आवाज दाबण्याचे काम प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून केले जाते आहे, अभिजित ठाकरे यांच्या विरोधात भ्रष्टाचार संदर्भात व बोगस प्रकरण बाबत जनतेकडून व राजकीय लोकांकडून आरोप केलेले आहे, संघटनेने देखील आरोप केलेले आहे. तरी सुद्धा कारवाई करण्यात आली नाही, मोताळा रेंज मधील वनरक्षक एल डी राठोड हे संघटनेच्या माध्यमातुन प्रशासकीय अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी उपोषणाला बसले होते , त्यांच्याकडून संघटना पदाधिकर्याबद्दल खोट्या तक्रारी करून, दबाव आणून भिती चे वातावरण तयार झाले आहे वनरक्षक व वनपाल कर्मचाऱ्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

अभिजित ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची दखल घेऊन त्यांची तात्काळ जिल्ह्याबाहेर बदली करावी, उपवनसंरक्षक, बुलढाणा यांनी वस्तुस्थितीची शहानिशा न करता 3 सप्टेंबर रोजी काढलेले पत्र तात्काळ रद्द करा, तसेच एल डी राठोड यांना संघटनेच्या अध्यक्षांच्या विरोधात खोटी तक्रार देण्यास का भाग पाडले याबाबत सखोल चौकशी करून दोषिवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गजानन पोटे व सचिव के एन सलामे यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्य वन संरक्षक, अमरावती, सहाय्यक वन संरक्षक, बुलढाणा, अध्यक्ष,सचिव महाराष्ट्र वनरक्षक व वनपाल संघटना नागपूर यांना पाठविल्या आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये