ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खोदलेला रस्ता वाहतुकीस धोकादायक!

काम तत्काळ करण्याची नागरिकांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- शहरातील महावितरण कार्यालय ते सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय इथपर्यंतचा तेलंगणात जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पूर्णता खोदून ठेवल्याने वाहनचालक व नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. महावितरण कार्यालय ते सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय पर्यंतचा रस्ता गेल्या महिन्याभरापासून खोदण्यात
आला आहे. मात्र अद्यापही हे काम अर्धवट असल्याचे दिसून येत आहे. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी हाच एकमेव मार्ग असल्याने या रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात
वाहतूककोंडी होत आहे. हा रस्ता महिन्याभरापासून खोदण्यात आला आहे. खोदलेल्या रस्त्यावर नुसती गिट्टी टाकण्यात आली आहे, त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा व वाहतूककोंडी निर्माण होत आहे. परिणामी, पादचारी व वाहनचालकांची मोठी
गैरसोय होत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्याचे काम तत्काळ करायचे नव्हते तर रस्ते खोदले कश्याला असा प्रश्न नागरिक करतांना दिसत आहेत. रस्त्यावर टाकण्यात आलेल्या गिट्टीमुळे अपघाताची भीती आहे. त्यामुळे रस्त्याचे हे काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी होत आहे.

◆ रहदारीच्या मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी खोदाई केली. मात्र रस्तादुरुस्तीचे काम तातडीने करण्यात येत नाही. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

– पुंडलिक वारे, नागरिक जिवती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये