ताज्या घडामोडी

ॲड. वामनराव चटपांच्या बॅनरची विटंबना – राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजकारण गढुळ करण्याचा प्रयत्न

पराभव दिसु लागल्याने विरोधकांचे खालच्या स्तराचे राजकारण - विलास धांडे

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा विधानसभा क्षेत्रात राजकीय आखाडा नेहमीच चुरशीचा राहत असला, विरोधकांचा एकमेकांना टोकाचा विरोध असला तरीही क्षेत्रातील राजकारणाचा दर्जा टिकवुन ठेवण्यात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यश मिळविले होते मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ह्या समृध्द परंपरेला गालबोट लावण्याचे प्रकार काही राजकीय नेत्यांकडून सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले असुन क्षेत्रातील जेष्ठ नेते तथा तीन वेळा ह्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व केलेल्या ॲड. वामनराव चटप ह्यांच्या निवडणुक प्रचार बॅनरला गडचांदुर येथे खालच्या स्तराचे राजकारण करीत शेण फासून विटंबना केल्याची निंदनीय घटना उघडकीस आल्याने चटप समर्थकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

विधानसभेची रणधुमाळी गाजू लागली आहे. दिवसेंदिवस ॲड. वामनराव चटप यांना मिळणाऱ्या जनतेचा पाठिंबा वाढताना दिसतोय. ॲड. वामनराव चटप यांची प्रचारातली आघाडी बघून विरोधकांचे धाबे दणाणले आहे. ॲड. वामनराव चटप यांचे गडचांदूर शहरातील पोलीस स्टेशन जवळ प्रचार बॅनर लागले आहे. बॅनरवरील ॲड. वामनराव चटप यांच्या फोटोला शेण फासण्याचे कुटील काम अज्ञात व्यक्तीने केले आहे. इतक्या खालच्या स्तराचे विरोधकांचे राजकारण निषेधार्ह असल्याचे म्हणत शेतकरी संघटनेने गडचांदूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे.

तीनदा आमदारकी भूषविणारे ॲड. वामनराव चटप यांचा जनमाणसात मोठा आदर आहे. नागरिक व कार्यकर्ते या घटनेविषयी संतप्त असून रोष व्यक्त करीत आहे.

शेतकरी संघटनेचे विलास धांडे, रत्नाकर चटप, नरेश सातपुते, अरुण रागीट, अतुल थोटे, मोरेश्वर अस्वले, अरुण काळे, अविनाश डोहे, अनिल कौरासे, गजानन टेकाम आदींनी याविषयी लेखी तक्रार ठाणेदार यांना दिली असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये