ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पत्रकार नितीन जपे यांचे दुःखद निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाचे सदस्य तथा स्वस्त धान्य दुकानदार नितीन जपे यांचे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. त्यांचे वय 42 वर्षे होते.त्यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुले,भाऊ,वहिनी, असा बराच मोठा आप्तेष्ट परिवार आहे.
त्यांच्यावर शहरातील वैकुंठ धाम हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळेस राजकीय, सामाजिक, पत्रकारिता,व्यापार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.