ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिवाळी साठी बाहेरगावी जाताना काळजी घ्यावी – पोलिस निरीक्षक संतोष महल्ये 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

पोलीस स्टेशन देऊळगाव राजा तर्फे सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की,सण उत्सवा निमित्त बाहेरगांवी गेल्या नंतर घरात चोरी होऊ नये म्हणुन दक्षता घ्यावी असे आवाहन पोलिस निरीक्षक संतोष महल्ल्ये यांनी केले आहे.. घर कुलुप बंद करून बाहेर गावी जाताना शेजारी आपला पहारेकरी या म्हणी प्रमाणे शेजाऱ्यास आपल्या कुलुपबंद घरावर लक्ष ठेवण्या बाबत कळवावे.

 घराच्या दरवाज्यास उच्च प्रतीचे कुलुप व कोंडा लावावे. बाहेरून दिसणारे घरातील लाईट चालू स्थितीत ठेवावे. शक्य असल्यास आपल्या घराच्या आवती भोवती चांगल्या प्रतीचे (नाईट व्हिजन) CCTV कॅमेरे लावण्यात यावे.

 आपल्या गल्लीत काहीतरी विक्री करण्याचे उद्देशाने अनोळखी इसम आल्यास त्या व्यक्तीची सखोल चौकशी करावी, शक्य झाल्यास आपल्या मोबाईल मध्ये त्या इसमाचा फोटो काढुन घ्यावा.बाहेरगावी जाताना सबंधीत पोलीस स्टेशन बीट अंमलदार यांना कळवावे.

शक्य झाल्यास घरातील सोन्या, चांदीचे दागीने किंवा घरातील मौल्यवान वस्तु व रोख रक्कम घरातील कपाटात न ठेवता बँकेमध्ये, लॉकर मध्ये ठेवावे कारण चोरट्यांचे घरातील कपाट हे पहिले टार्गेंट असते.

आपल्या घराच्या आजुबाजुच्या परिसरातील लाईट रात्रीचे वेळी चालू स्थितीत राहतील या बाबत प्रयत्न करावे.. चोरी केल्या नंतर लवकरात लवकर गावाबाहेर पडता यावे या दृष्टीने गावातील किंवा शहराच्या कडेला असलेली घरे हि चोरट्यांचे टार्गेटवर असतात, त्यामुळे गावाच्या किंवा शहराच्या कडेला असणाऱ्या घर मालकानी जास्त काळजी घ्यावी.

आपल्या गल्लीत किंवा गावा मध्य ग्राम सुरक्षा दल स्थापन करून आळी पाळीने आपल्या गल्लीत किवा गावात रात्रगस्त ठेवावी.

 शक्यतो आपल्या घरात सर्व मानसे बाहेर गावी न जाता एखादा व्यक्ती घरी राहिल या बाबत दक्षता घ्यावी. असे आवाहन पोलिस निरीक्षक संतोष महल्ये यांनी केले आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये