ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री संत गजानन महाराज इव्हनिंग वॉक ग्रुप तर्फे शैक्षणिक अभ्यास दौरा

पालडोह शाळेला भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

श्री संत गजानन महाराज इव्हनिंग वॉक ग्रुप गडचांदूर तर्फे माणिकगड पहाडावरील जीवती तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी भागात असलेल्या देशातील वर्षातून 365 दिवस शाळा सुरू असलेली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडोह येथे भेट दिली शैक्षणिक अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने या भेटीत शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी यांची भेट घेऊन विध्यार्थी व शिक्षकांशी सवांद साधला व शाळेच्या प्रगतीबदल त्यानी माहिती दिली भेटीत त्यानी विद्यार्थ्यांच्या जीवनात शैक्षणिक परिवर्तन करण्याचा दृढ संकल्प करून अतिदुर्गम व आदिवासी गावात विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा या साठी प्रयत्न असल्याचे त्यानी सांगितले पालडोह शाळेत पहीली ते नववी पर्यंत मुले आणि मुली मिडून एकूण 183 मुले शिक्षण घेत असल्याचे ते म्हणाले शाळेचे विध्यार्थी शिस्तबद्ध व नियमित अभ्यास व शैक्षणिक उपक्रम राबवित असल्याचे दिसून आले.

 शिक्षक सुध्दा खूप परिश्रम घेत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी यावेळी श्री संत गजानन महाराज इव्हनिंग वॉक ग्रुप गडचांदूरचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार व उपाध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य कृष्णा बततुलवार यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबदल मोलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांशी सवांद साधला यावेळी येथिल नववीच्या एका विद्यार्थीनी प्रा विजय आकनुरवार यांची मुलाखत घेतली या दरम्यान तिला आपल्या अभ्यासा विषयी विचारले असता तिनेआपल्या जीवनाचे ध्येय ठरवून जिद्दीने अभ्यास करीत असल्याचे सांगितले यावेळीअभ्यास दौऱ्याचे स्वागत मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी व त्यांच्या शिक्षकांनी केले यावेळी संत गजानन महाराज इव्हनिंग वॉक ग्रूपचे अध्यक्ष प्रा विजय आकनुरवार, उपाध्यक्ष कृष्णा बततुलवार सदस्य डॉ. विश्वास, पंकज गंपावार,सारंग पामपटीवार येथिल शिक्षक सुरेश पानघाटे,गजानन राठोड, विनोद खवशी, सतिश खवशी, सुनील आडे,सौ कविता वाघमारे, सौ विश्रांती धुलगुंडे, आशिष उमरे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये