वर्धा नदीचे घाटामध्ये सुरु असलेल्या अवैध रेती उत्खनन करणा-यांवर अल्लीपुर पोलिसांची धाड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 28/05/2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहीती वरुन कापसी गावालगत असलेल्या वर्धा नदीचे घाटामध्ये सुरु असलेल्या अवैध रेती उत्खनन करणा-यांवर अल्लीपुर पोलीसांनी धाड टाकुन कारवाई केली.
सदर कारवाईमध्ये पोलीसांनी पाच ट्रॅक्टर, पाच ट्रॉली व रेतीसह 30,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन पाच ट्रॅक्टर चे चालक व मालक अशा एकुण दहा आरोपींविरुद्ध अल्लीपुर पोलीसांनी अपराध क्रमांक 287/ 2025 कलम 303(2),62,3 (5) BNS सहकलम 3(1), 181,130,177 मोवाका अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक सा. वर्धा, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सा. वर्धा, मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक सा. पुलगाव यांचे निर्देशाप्रमाणे सपोनि प्रफुल डाहुले यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोहवा अतुल लभाने, अजय रिठे, राहुल नव्हाते, अनुप नाईक, रवि वर्मा, पोअं. योगेश चंदनखेडे, तुषार भोंबे यांनी केली.