ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना येथे काँग्रेसची आढावा बैठक : आमदार सुभाष धोटे यांनी घेतला आढावा

मधुकर गौरकार, दीपक माहुरे, बंडू कुमरे, सुदर्शन खनके आदिंचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना तालुक्यातील श्रीकृष्ण हॉल सभागृह येथे कोरपना काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी आ. सुभाष धोटे यांनी उपस्थितांशी संवाद साधून जनतेचे प्रश्न, विधानसभा निवडणुकीसंदर्भात तयारी, येणाऱ्या अडचणी इत्यादी बाबतीत सविस्तर चर्चा केली. यावेळी वनसडी येथील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मधुकर गौरकार यांनी आ. सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. तसेच बोरगाव भाजप चे बंडू कुमरे, दीपक माहुरे, नांदा फाटा येथील सुदर्शन खणके यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सर्वांना काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन सर्वांचे आ. सुभाष धोटे यांनी स्वागत केले.

यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नवप्रवेशीत कार्यकर्ते यांनी विधानसभा निवडणुकीत आ. सुभाष धोटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार पक्का करून कामाला लागण्याचा संकल्प व्यक्त केला.

    यावेळी कोरपना काँग्रेसचे जेष्ठ नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, दिनकर मालेकर, सुरेश मालेकर, श्यामभाऊ रणदिवे, विनोद नवले, दामोदर मालेकर, गणेश गोडे, आशाताई खासरे, नितीन बावणे, वामन मुसने, संजय ढवस, माणिकराव देवाडकर, विजय कोल्हे, मंगेश वडस्कर, सुरेश वडस्कर, प्रमोद पिंपळशेंडे, मधुकर गौरकार, विनोद नवले, भाऊराव कारेकर, रसूल पटेल, भारत चन्ने, इस्माईल शेख, दीपक खेकारे, इरफान शेख, प्रा. आशिष देरकर, उमेश राजुरकर, अभय मुनोज, शैलेश लोखंडे, रोशन मरापे, कैलास मडावी, संजय जाधव, सुदर्शन खनके, कादिर बेग, बाबाराव मालेकर, राहुल मालेकर, दत्ता मसे, ज्ञानेश्वर आवारी, राजू ठाकरे, प्रेम बोंडे यासह कोरपना काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये