ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल

24 वर्षीय युवकावर गुन्हा दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरातील संजय नगर भागात राहणाऱ्या 24 वर्षीय युवकाने समाजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची रील इंस्टाग्राम वर व्हायरल केली होती त्याप्रकरणी आज देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 सविस्तर वृत्त असे की  देऊळगाव राजा शहरात श्री बालाजी महाराजांची यात्रा सुरू असून जातीय सलोखा राहावा यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे याला अपवाद वगळता गेल्या पंधरवड्यात सुद्धा अशाच प्रकारची घटना देऊळगाव राजा शहरात घडली होती त्यावर अतिशय अल्प कालावधीतच घडलेल्या या घटनेमुळे शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

या संदर्भात सरकारी पक्षातर्फे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद गवई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहरातील संजय नगर भागात राहणाऱ्या आरोपी आकाश ज्ञानेश्वर सोनुने वय 24 वर्ष याने त्याच्या मोबाईल वरील इंस्टाग्राम वरील आयडी वरून आज दुपारी दीडच्या सुमारास लॉरेन्स बिश्नोई तसेच कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम यांच्या संदर्भात आक्षेपाहार्य रील व्हायरल केले त्यावरून शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य केले या संदर्भात माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने या संदर्भात भारतीय दंड विधान सोशल मीडिया अॅक्ट अन्वये सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद गवई करत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये