ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मांचे 80 व्या वर्षी निधन

उद्या सकाळी 9 वाजता होणार अंत्यविधी

चांदा ब्लास्ट

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांचे आज आजाराने निधन झाले. चंद्रपूर येथील राजमाता निवासस्थानी सकाळी 9.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सोमवारी सकाळी 9 वाजता गांधी चौक येथील कोतवाली वार्ड येथील घरून अंत्ययात्रा निघणार आहे. बिनवा गेट येथील शांतीधाम येथे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे.

अम्मांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना विविध संस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या नावाने चंद्रपूरात सुरु असलेल्या “अम्मा का टिफिन” आणि “अम्मा कि दुकान” या उपक्रमामुळे अनेकांना हक्काची साथ मिळाली होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने उपचारासाठी त्यांना नागपूर येथे दाखल करण्यात आले होते. जवळपास 10 दिवस नागपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.

प्रकृतीत सुधारणा झाल्याने काल शनिवारीच त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. घरी डॉक्टरांच्या निगराणीत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांच्या प्रकृतीत पुन्हा बिघाड झाला आणि सकाळी 9.30 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये