ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवरात्रीच्या उत्सवामध्ये अनैसर्गिक कृत्य घडू नये याकरिता वर्धा शहरात चौकात चौकात नाकेबंदी

पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांचे कडक आदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक रोजी संपुर्ण वर्धा जिल्हात कायद्याचे उल्लंघन करतांना आढळून आल्यास त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल असे आदेश वर्धा जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी पारीत केलेले असुन याकरिता पोलिस स्टेशन वर्धा शहर अंतर्गत असलेले बजाज चौकामध्ये वर्धा पोलिस स्टेशनचे ठाणेदार पराग पोटे व पोलिस उपनिरीक्षक सुरज गुजर व पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड पथकाचे कर्मचारी यांनी रात्रीच्या दोन ते तीन च्या दरम्यान दुचाकी तसेच तीन चाकी वाहने व चारचाकी वाहने तपासणी करून कायद्याचे उल्लंघन करतांना आढळून आलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे.

हि कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कुमार कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक चौधरी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी व वर्धा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पराग पोटे पोलिस उपनिरीक्षक सुरज गुजर हेड कॉन्स्टेबल विजय पंचटीके पोलिस शिपाई सागर पोलिस शिपाई अमोल गजवंट मयुर व इतर पोलिस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी व तसेच होमगार्ड सैनिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये