ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुनगर वार्डातील समस्यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

   शहरातील गुरुनगर वार्डातील वृंदावन सभागृहाजवळून जाणाऱ्या रस्त्यासह नालीचे बांधकाम आणि पथदिवे लावण्यात यावे. अशा आशयाचे निवेदन या भागातील रहिवाशांनी नगरपरिषद मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांना दिले.

   आपल्या मागण्या करिता आपण पुढाकार घेऊन त्या लवकर पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी शिस्टमंडळास दिले. हा भाग नवीन बस स्थानकाच्या अगदी जवळचा आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. नाल्यातील दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने त्याचा त्रास रस्त्याने ये जा करणाऱ्या पादचाऱ्यांना तसेच या भागातील रहिवाशांना होतो. तसेच रस्त्यावर सांडपाणी व पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. पथदिव्याची व्यवस्था नसल्याने रात्रौला या मार्गाने जावयास महिला धजावत नाही.या सगळ्या समस्या लक्षात घेता त्या त्वरित मार्गी लावण्यात याव्यात असे निवेदनात म्हटले आहे.

    यावेळी दिलीप ठेंगे,आशिष देहारकर ,दिलीप मांढरे, राजू गैनवार, कैलास लांडगे,योगेश (गोलू) ठेंगे,प्रमोद क्षिरसागर,बाबा एकरे,रवि इंगोले,पुरूषोत्तम नैताम,घनश्याम नांदेकर,कवडूजी पावडे आणि इतर नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये