ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल देऊळगाव राजा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महान भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रमण यांनी केलेल्या रामन प्रभावाचा शोध साजरा करण्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी देशात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या दिवशी सीव्ही रामन यांनी रामन इफेक्टचा शोध जाहीर केला. दरवर्षी हा दिवस वेगळ्या थीमने साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे प्रेरित करणे आणि सर्वसामान्यांना विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीची जाणीव करून देणे हा आहे. या दिवशी शाळा, महाविद्यालयांमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

याच धरतीवर राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल देऊळगाव राजा मध्ये यावर्षी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी जाहीर केलेली राष्ट्रीय विज्ञान दिन ची थीम ‘विकसित भारतासाठी भारतीय स्वदेशी तंत्रज्ञान’ या थीमवर आधारित साजरा केला जात आहे यामध्ये राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मधील वर्ग सात मधील गौरी चव्हाण या विद्यार्थिनीने सूर्य ग्रहण आणि चंद्रग्रहण कसे होते याचे प्रयोगातून समजावून सांगितले.

यामध्ये तिचा प्रथम क्रमांक आला तर वर्ग सहा मधील अनोखी बरलोटा हिने कंपनीचे जे केमिकल युक्त पाणी आहे त्यामुळे प्रदूषित होते आणि नदीचे पाणी दूषित होऊन रोग पसरतात त्याचे नियोजन कसे करायचे हे तिने प्रयोगातून समजावून सांगितले यामध्ये तिचा दुसरा क्रमांक आला तर पहिल्या वर्गातील श्रेयांश समाधान पालोदकर याने सुंदर घराचे मॉडेल बनविले त्याचा तिसरा नंबर आला.

यावेळी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल च्या अध्यक्ष मीनलताई शेळके, सचिव डॉक्टर रामप्रसाद शेळके, सीईओ सुजित गुप्ता, फैजल ओस्मानी सर यांनी मुलाचे कौतुक करून मुलांनी असेच विज्ञानामध्ये नवनवीन प्रयोग करावेत यासाठी शुभेच्छा ही दिल्या आकाश अग्रवाल, खुपचंद वर्मा,पायल शिंदे, या विज्ञान शिक्षकांनी या प्रयोगांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले गणेश पंडित सर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये