Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून होणार जिल्हा ग्रंथालयाचे आधुनिकीकरण

14 कोटी 90 लक्ष रुपयाची प्रशासकीय मान्यता ; ना.मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित

चांदा ब्लास्ट

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना होणार लाभ

चंद्रपूर : विद्यार्थ्यांचे शिक्षण असो की स्पर्धा परीक्षेची तयारी, विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट सुविधा देण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार कायम प्रयत्नशील असतात. त्यांच्या त्या प्रयत्नांतून आता जिल्हा ग्रंथालयाचे आधुनिकीकरण होणार आहे. त्यासाठी 14 कोटी 90 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून या ग्रंथालयाचा लाभ जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

चंद्रपूर शहरातील प्रस्तावित जिल्हा ग्रंथालयाच्या आधुनिकीकरणाच्या कामाला ‘कौशल्य विकास’ या घटकांतर्गत 14 कोटी 90 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठान मधून निधी वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

नियामक परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विनय गौडा, यांच्या अध्यक्षतेत जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या 21 डिसेंबर 2023 रोजी पार पडलेल्या नियामक परिषदेमध्ये या कामाला प्रशासकीय मान्यता तसेच मंजुरी देण्यात आली आहे.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी, चंद्रपूर कार्यालयामार्फत शहरातील प्रस्तावित जिल्हा ग्रंथालयाच्या आधुनिकीकरणाकरिता जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून प्रशासकीय मान्यता देण्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे.

सतत आग्रही

ना.सुधीर मुनगंटीवार १९९५ मध्ये पाहिलांदा आमदार झाले तेव्हा वाचनालय सुरु करण्याची घोषणा केली. घोषणा करून थांबतील ते मुनगंटीवार कसले. त्यांनी हे काम आणखी उत्साहाने पुढे नेले. त्यानंतर चंद्रपूर, बल्लारपूर, पोंभुर्णा, मुल व जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाचनालये सुरू केली. त्या वाचनालयामुळे अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत राज्यभर काम करत आहेत. वाचन संस्कृती प्रगल्भ आणि आधुनिक व्हावी यासाठी ना. मुनगंटीवार कायम आग्रही असतात, हे विशेष

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये