Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उमेद कॅडर व पदाधिकारी यांचे करिता आरोग्य शिबीर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 नगरपंचायत कार्यालय जिवती येथे उमेद -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात कार्यरत कर्मचारी व कॅडर (उमेद) यांचे टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन चंद्रपूर व तालुका आरोग्य विभाग जिवती व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने 27 सप्टेंबर रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर आरोग्य तपासणी मध्ये बी. पी, शुगर, रक्त तपासणी, दंत तपासणी व स्तनाचे व गर्भशयाचे कॅन्सर इत्यादी आरोग्य तपासणी 130 लोकांची करण्यात आली.

    आरोग्य शिबीर हे डॉ. स्वप्नील टेंभे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. या शिबिराचे उदघाट्न डॉ. शुभम लाहमगे आरोग्य अधिकारी जिवती, डॉ. बापूराव जाधव आरोग्य अधिकारी आपला दवाखाना जिवती, व टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन चे डॉ.सुरज साळुंखे व ट्विंकल मॅडम व श्री. राजेश दुधे तालुका अभियान व्यवस्थापक जिवती यांच्या हस्ते करण्यात आले.

मार्गदर्शन मध्ये कॅन्सर चे प्रकार व त्यांची लक्षणें व वेळेत तपासणी व उपचार या विषयावर उपस्थित डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.

सदर आरोग्य शिबिराला डॉ. टेंभे सर तालुका आरोग्य अधिकारी यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. आरोग्य सहाय्यक श्री दिनेश जी मोरे उपस्थित होते.

 हे आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी श्री. उद्धव मडावी, श्री.दीपक गायकवाड, श्री.किशोर हिंगाने, श्री.प्रकाश रामटेक सर या सर्व उमेद कर्मचारी व सौ. ललिता जाधव, सौ. राठोड सी. टी. सी, श्री. शामू जोंधळे, श्री. हनुमंत अलट कृषी व्यवस्थापक व सर्व उमेद कॅडर यांनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये