Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाला वडगांव येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संपन्न

सेवानिवृत प्राचार्य संजय ठावरी यांनी केले मार्गदर्शन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

पीएम श्री उच्च प्राथमिक शाला वडगांव तालुका कोरपना येथे “मिशन आयएएस” अंतर्गत सेवानिवृत्त प्राचार्य संजय ठावरी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सखारामजी परचाके होते. तर प्रमुख अतिथि म्हणून ग्रामगीताचार्य विठ्ठलराव डाखरे महाराज,केंद्रप्रमुख विलास देवाळकर, वसंत गोरे शिवाजी माने,नितिन जुलमे, विनायक मडावी, पुष्पा ईरपात, काकासाहेब नागरे, उपस्थित होते.

कार्यशाळेच्या सुरुवातीला सेवानिवृत्त प्राचार्य संजय ठावरी यांचे स्वागत करण्यात आले.त्यांनी विद्यार्थ्यांना संस्कार प्रकाशन लातुर द्वारा घेण्यात येणाऱ्या ज्युनीअर आयएएस परीक्षेच्या आयोजन टप्प्यांबाबत माहिती दिली आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या तयारी विषयी सल्ला दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, आणि तयारीच्या योग्य रणनीती याबद्दल माहिती दिली.

विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. ठावरी यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आत्मविश्वास, मेहनत, आणि सातत्याची महत्त्वपूर्ण भूमिका सांगितली. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. व परीक्षेस बसन्याची तयारी दर्शविली.

शेवटी काकासाहेब नागरे यांनी आभार मानले आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्यांचा त्यांच्या अभ्यासात नक्कीच फायदा होईल असे व्यक्त केले. या उपक्रमामुळे वडगांव येथील विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयाच्या दिशेने अधिक प्रभावीपणे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये