ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आरोग्य विभागात कोरपना व जीवती तालुक्याचे सुयश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

चंद्रपूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत 2023-2024 च्या कुटुंबकल्याण कार्यक्रम व फ्लोरेन्स नाईटिंगल गौरव पुरस्कार व तसेच आशास्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक पारितोषिक समारंभ दि. 26 मार्च रोजी नियोजन भवन चंद्रपूर येथे संपन्न झाला त्या वेळी आदिवासी बहुल अतिदुर्गम डोंगराळ नक्षलग्रस्त आकांक्षित तालुका जीवती /कोरपना तालुक्यातील अधिकारी कर्मचारी सदर पारितोषिक सोहळ्यात सुयश मिळवले आहे. यामध्ये प्रामुख्याने सण 2023 ते 2024 प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा येथील डॉ. शालिनी तरोने व प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथील डॉ. कविता शर्मा यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार मिळाला.

प्रसूती पश्चात तांबी बसवण्याच्या कार्यात प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती चे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम लहा मगे यांना सुद्धा प्रथम पुरस्कार मिळाला. त्याच प्रमाणे मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आरोग्य सेविका सुनीता राऊत यांना द्वितीय पुरस्कार आरोग्य सहाय्यक ( स्त्री)अश्विनी खोब्रागडे यांना द्वितीय पुरस्कार, श्री.सुरेश कुळसंगे आरोग्य सहाय्यक ( पुरुष) यांना कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया प्रथम पुरस्कार मिळाला. त्याच प्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथील आरोग्य सहाय्यक ( स्त्री) श्रीमती.यशोदा राठोड यांना जिल्ह्यातील फ्लोरेन्स नाईटिंगल द्वितीय गौरव पुरस्कार प्राप्त झाला. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा मधून तांबी जिल्ह्यामधून सर्वाधिक केसेस केल्यामुळे आशास्वयंसेविका श्रीमती. अनुश्री दिलीप सिडाम यांना प्रथम पारितोषिक मिळाले. व प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा येथील आशा सेविका रत्नमाला चहारे व योगिता दिलीप वांढरे यांना द्वितीय पुरस्कार प्राप्त झाले.

तसेच जीवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्र जीवती येथील मनीषा विलास नंदगीरवार यांना जिल्ह्यामधून आशा गटप्रवर्तक मधून तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. आणि आशा स्वयंसेविका प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण सुरेखा रामचंद्र गायकवाड, शोभा विक्रम गायकवाड, पंचफुला गोवर्धन चव्हाण यांना प्रथम द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त झाले आहे. तालुका आरोग्य अधिकारी कोरप णा व जिवती डॉ. स्वप्नील टेंभे, सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या सहकार्याने हे शक्य झाले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये