Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारूबंदीसाठी महिला उतरल्या रस्त्यावर!

अवैध दारूविक्री विरोधात रस्त्यावर उतरून कायदा हातात घेण्याचा महिलांचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

पाटण :- तालुक्यातील पाटण येथे राजरोसपणे अवैध दारूविक्री होत आहे. ही बाब पाटण येथील पोलिस प्रशासनाला वेळोवेळी लक्षात आणून दिली,मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत कोणतीही कार्यवाही करीत नाही असा आरोप पाटण येथील महिलांनी केला आहे. जर पोलिसांनी अवैध दारू विक्री बंद केली नाही तर कायदा हातात घेऊ असा इशाराही यावेळी महिलांनी दिला आहे. सध्या पाटण परिसरात सर्वसामान्यांना रोजगार नाही,काम धंदे बंद असल्यामुळे सामान्य कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यातच पाटण येथे अवैध दारू विक्रीला उत आला आहे. गावात राजरोसपणे दारूची अवैधरीत्या विक्री होत आहे.

त्यामुळे गावातील शाळकरी मुले,तरुण,गावकरी त्याच्या आहारी गेले आहेत.व्यसनामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडत आहेत. घरी व गावात तंट्याचे प्रमाण वाढले आहे असा आरोप करत महिलांनी अवैध दारूविक्री बंद करावी यासाठी गावातील महिलांनी अवैध दारू पकडत एन बाजाराच्या दिवशी चार तास राज्य मार्ग बंद केला.

गावकऱ्यांनी अवैध दारूविक्री वेळोवेळी पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली मात्र पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते,त्यामुळे संतृप्त महिलांनी गावातील अवैध दारू पकडत चार तास राज्य मार्ग बंद केला. गावात चालू असलेली अवैध दारूविक्री तत्काळ बंद करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून कायदा हातात घेऊ असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी जंगुबाई मडावी, वंदना उईके,रेणुका मडावी, गोदुबाई मडावी, सावित्रा मडावी, मीराबाई कोवे, अनिता मंडळी,रेखा आत्राम, इंदुबाई आत्राम, इमला उईके आदी महिला उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये