Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या 

जिवती तालुक्यातील ताडी हिरापूर येथील घटना 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

मृतदेह अजूनही हाती लागला नाही 

जिवती :- अतिदुर्गम व आदिवासी बहुल भाग म्हणून ओळख असलेल्या जिवतीत दिवसेंदिवस हत्याचे सत्र सुरुच आहे.येथील गुन्हेगारीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत.नुकतीच जिवती पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ताडी हिरापुर येथील एका व्यक्तीची अनैतिक संबंधातून प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने दगडाने ठेचून हत्या करित वर्धा नदीत फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली असून रामदास रावसाहेब नंदेवाड (वय २८) ताडी हिरापूर असे मृतकाचे नाव आहे.संगनमत आणि फौजदारी कट रचून बेपत्ता रामदास नंदेवाड ची हत्या केल्याप्रकरणी पत्नी रेणुका रामदास नंदेवाड (२८)राज.ताडी हिरापूर व प्रियकर श्रिनिवास बापूराव घंटेवाड (३०) रा.भोलापठार यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे

            पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रामदास रावसाहेब नंदेवाड हा ५ स्पटेंबर ला घरून कोंबडा घेऊन येतो असे म्हणत घरून निघाला मात्र परत आला नाही अशी तक्रार पत्नी रेणुका रामदास नंदेवाड यांनी जिवती पोलिसांत दिली होती त्यानुसार जिवती पोलिस तपास करिता होते परंतु हाती काहीच मिळत नव्हते. नातेवाईकांचाही पोलिसांवर दबाव वाढत चालला होता त्यामुळे पोलिसही अडचणीत पडले होते.जिवती पोलिस ठाण्यात नव्याने रूजू झालेले पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांनी तपास कार्य वेगवेगळ्या दिशेने फिरविले त्यात त्यांना रेणुका नंदेवाड यांच्या प्रियकराची माहिती मिळाली त्याला पोलिसी हिच्या दाखवताच बेपत्ता रामदास नंदेवाड याची दगडाने डोके ठेचून हत्या केली आणि त्याला राजुरा येथील वर्धा नदीच्या पुलावरून नदीत फेकून दिल्याची कबुली दिली त्यानुसार तपास केला परंतु रामदास नंदेवाड चा मृतदेह अजूनही पोलिसांना मिळाला नाही.आरोपी श्रिनिवास घंटेवाड व रेणुका नंदेवाड यांचे लग्नाच्या पुर्वीपासूनच एकमेकांत अनैतिक संबंध जुळले होते त्यामुळे नेहमी दोघांत मोबाइलद्वारे संभाषण व्हायचे.नेहमी प्रियकरासोबत पतीचा गेम करण्याची चर्चा करायची त्यानुसार आरोपी श्रिनिवासने रेणुकाच्या मदतीने कट रचला ठरल्याप्रमाणे आरोपी व रेणुकाचा प्रियकर श्रिनिवास घंटेवाड यांनी ५ स्पटेंबर रोजी रेणुकाचा पती रामदास ला फोन केला आणि दारू पिऊन मौज मजा करू असे म्हणत त्याला शेणगाव येथील टेकामांडवा फाट्यावर बोलावून घेतले.दोघांनी TS-20 T 7196 या क्रमांकाच्या ऑटोरिक्षात बसून गडचांदूर आले.गडचांदूरात दोघांनी मिळून दारू ढोसली रामदास दारू जास्त दारू झाल्याने रामदास तिथेच डोलायला लागला होता.पुन्हा दारू सोबत घेतली रामदासला कसेबसे ऑटोरिक्षात बसविले आणि राजुरा मार्गे निघाले वर्धा नदिच्या समोर जाऊन पुन्हा दारू पिली तिथे रामदास सुध्दिवरही नव्हता याचाच फायदा आरोपी श्रिनिवासने घेतला रामदासचे डोके दगडाने ठेचून ठार केले आणी त्याला वर्धा नदिच्या पुलावरून पुरात फेकून दिल्याची पोलिस जबाबात कबुली दिली.

मात्र अजूनही मृत्यक रामदास नंदेवाड चा मृतदेह आढळला नाही.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र जाधव यांनी जिवती पोलिस स्टेशन ला भेट दिली या प्रकरणात जिवती पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी श्रिनिवास घंटेवाड व रेणुका नंदेवाड यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले आहेत.पुढील तपास जिवती पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे करित आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये