सामाजिक उपक्रमातून भाजप जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
भाजपा व मित्रपरिवाराचे आयोजन ; आरोग्य सेवा व रुग्णांना फळवाटप, वृक्षारोपण व धार्मिक कार्यक्रम
चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : भाजपचे चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष राहुल पावडे यांचा वाढदिवस रविवारी (ता. ८) शहरांमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. भाजप मित्र परिवाराच्यावतीने शहरातील विविध भागात वृक्षारोपण, धार्मिक कार्यक्रमांसोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले.भाजप कार्यकर्त्यांनी सकाळी राहुल पावडे यांना शुभेच्छा देण्यासाठी घरी गर्दी केली. यानंतर भाजप महिला मोर्चातर्फे माता महाकाली मंदिर येथे आरती करण्यात आली. वाल्मिकी समाजतर्फे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. मुस्लिम समाजातर्फे दरगाह येथे चादर चढविण्यात आली. जलनगर येथील दूधडेअरी परिसरातील आश्रय वसतिगृह येथे महेश जिटे यांच्यातर्फे नोटबुक वितरण करण्यात आले. यासोबत अनेक प्रभागात वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले. राहुल पावडे हितचिंतक व मित्रपरिवारतर्फे शहरामध्ये वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जात असतानाच पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.
दिवसभर हजारो लोकांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून व प्रत्यक्ष भेट घेऊन पावडे यांना शुभेच्छा दिल्या. राहुल पावडे एक युवा नेतृत्व असून, युवकांचे प्रेरणास्थान म्हणून शहरात आज ओळख बनली असल्याचे उद्गार अनेकांनी शुभेच्छा संदेशात काढले. यावेळी पक्षश्रेष्ठींनी शुभेच्छा दिल्या .राहुल पावडे यांनी सर्वांचे आभार मानत,ना.मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजपाला आणखी मजबूत करण्याचा संकल्प केला.