Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुस शहरात डेंग्यू प्रतिबंधक औषधीची फवारणी करा- विवेक बोढे 

चांदा ब्लास्ट

घुग्घुस शहरात डेंग्यू प्रतिबंधक औषधीची फवारणी करा अशी मागणी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी निवेदनातून केली आहे.

सध्या घुग्घुस शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. बहिरमबाबा नगर येथील एका तरुणीचा रविवारला डेंग्यूने मृत्यू झाला तसेच दिवसेंदिवस डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होत आहे.

डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू रोगाची लागण शहरवासियांना मोठया प्रमाणात होत आहे. त्या अनुषंगाने शहरात डेंग्यू रोग प्रतिबंधक औषधाची फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

ही समस्या लक्षात घेत भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी शिष्टमंडळासह नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांची भेट घेतली व चर्चा करून निवेदन दिले.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी सरपंच संतोष नुने, संजय तिवारी, साजन गोहणे, चिन्नाजी नलभोगा, अमोल थेरे, शिवसेना शहरप्रमुख महेश डोंगे, हसन शेख, बबलू सातपुते, इर्शाद कुरेशी, प्रवीण सोदारी, शाम आगदारी,सुशील डांगे,अमोल नागपुरे, दिपक कामतवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये