देऊळगाव राजा येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, शहरातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालये येथे झेंडावंदन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तहसिल कार्यालय येथे ध्वजारोहण तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी पोलिस दलाने मानवंदना दिली, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना महाराष्ट्र दिनच्या शुभेच्छां दिल्या,याप्रसंगी नायब तहसीलदार, माजी सैनिक, शिक्षक,गावांतील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार उपस्थित होते
नगर परिषद कार्यालयात प्रशासक अरुण मोकळं यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, याप्रसंगी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक संतोष महल्ये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, या शिवाय विविध शाळा व महाविद्यालये येथे झेंडावंदन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.