ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विवाहित महीलेस मारहाण करून जिवे मारण्याची धमकी 

तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

तालुक्यातील पिंपळगाव चीलामखा येथे एका विवाहित महिलेच्या घरात प्रवेश करून मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना 16 ऑक्टोंबर रोजी रात्री अकरा वाजता घडली, पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी सौ सरस्वती विनोद थेटे ही मुलीसह ‘घरी झोपलेली असतांना आरोपी रामेश्र्वर प्रभाकर सवडे याने महिलेच्या घराची कडी वाजवली असता ती घराबाहेर आली व इतक्या रात्री तुमचे आमचे घरी काय काम आहे असे म्हणाली असता आरोपी याने त्याचे हातातील काडी महिलेच्या डोक्यात मारली.

महीला व मुलगी ही आरोपीच्या घरी जाउन सांगायला गेली असता आरोपी रंजना रामेश्र्वर सवडे हिने फिर्यादी महिलेस चापटा बुक्याने मारहाण केली व आरोपी प्रभाकर सवडे याने फीस शिवीगाळ केली व आरोपी रामेश्र्वर सवडे याने त्याचे हातातील चाकु हा फीचे हातावर मारला तेव्हा यातील साक्षीदार हा भांडण सोडवा सोडव करण्याकरीता आला असता त्याला सुध्दा आरोपी ने काडीने मारहाण केली. आरोपी पासुन माझे व माझे परीवाराचे जिवीतास धोका निर्माण झालेला आहे तो कधी काय करेल याचा काही नेम नाही तरी त्यांचेवर योग्य ती कारवाइ व्हावी.

अशी मागणी फिर्यादी महिलेने पोलीस ठाण्यात केली असून पोलिसांनी जखमी महिलेची वैद्यकीय तपासणी करून तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र चव्हाण करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये