Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर जिल्हा कारागृहात बंदी बांधवांसोबत रक्षबंधन कार्यक्रम साजरा 

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर – रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर व चंद्रपूर जिल्हा कारागृह यांचे संयुक्त विद्यमाने बंदीगृहातील बंदी बांधवांकरीता १९ ऑगस्ट २०२४ रोजी रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होती. यावेळी रोटरी क्लबच्या भगिनींनी बंदी बांधवांना राख्या बांधून हा दिवस साजरा केला.

या कार्यक्रमाचे प्रकल्प निर्देशक डॉ आसावरी देवतळे व नंदाताई आलूरवार ह्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा ठरविली. सकाळी ९.३० वाजता रोटरी क्लॅबचे अध्यक्ष अजय पालारपवार, सदस्य डॉ प्रणीता ओसवाल, श्रीमती स्मिता जिवतोडे, अलका ठाकरे, नंदाताई आलूरवार, अर्चना पालारपवार, रमेश गोयल, मिलींद बोडखे कारागृहात उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष अजय पालारपवार यांनी प्रास्ताविक भाषणात मनोगत व्यक्त करतांना रोटरी क्लब चंद्रपूरच्या वतीने दरवर्षी बंदीगृहातील बंदी बांधवांसोबत रक्षबंधन दिवस साजरा केला जात असल्याचे सांगितले. तसेच नंदाताई आलूरवार व डॉ अलका ठाकरे यांनी रक्षाबंधनाचे महत्व उपस्थित कैदी बांधवांना समजावून सांगितले. जिल्हा कारागृहाचे वरिष्ठ तुरूंग अधिकारी सतिश सोनवने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रोटरी क्लबच्या सर्व महिला सदस्यांनी बंदी बांधवांना राखी बांधून व मिठाई वाटप करून त्यांचेकडून बहिनींच्या रक्षेचे आश्वासन घेतले. रोटरी क्लबचे सचिव मिलींद बोडखे यांनी आभार प्रदर्शन केले. कारागृहाचे शिक्षक संजीव हतवादे यांनी कार्यक्रमाची सांगता केली असे रोटरीचे सचिव मिलींद बोडखे कळवितात.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये