अवैध्यरीत्या चोरीची पांढरी रेतीची वाहतुक करणाऱ्या ट्रक चालक व मालकाविरुध्द कार्यवाही
एकूण किंमत २० लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा चे पथक पोलीस स्टेशन सेलु परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीरव्दारे मिळालेल्या खात्रीशीर माहीती वरुन समृध्दी महामार्ग वरील कोटंबा शिवारात चैनल कमांक ४० मुंबई कॉरीडोर परीसरात नाकेबंदी करुन मिळालेल्या माहीती प्रमाणे टाटा कंम्पनीचा १४ चक्का ट्रक क्रमांक एम.एच. ३४ बी.झेड. ३६३५ ला थांबवुन ट्रक चालक यास विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव १) सय्यद नईम सय्यद मोहम्मद, वय ३६ वर्षे, रा. छायानगर, अमरावती असे असल्याचे सांगुन त्यांचे ताब्यातील टाटा कंम्पनीचा १४ चक्का ट्रक कमांक एम.एच. ३४ बी.झेड. ३६३५ ची पाहणी केली असता त्यामध्ये अवैध्यरीत्या पांढरी ओली रेती ९ ब्रास (९०० फुट) मिळुन आली त्यास सदर रेतीचे वाहतुकीची रॉयलटी विचारले असता त्याने नसल्याचे सांगुन ट्रक मालक नामे आरोपी कमांक २) रिजवान हुसेन रा. अमरावती यांचे सांगणे प्रमाणे वैनगंगा नदिचे पात्रातुन मुल जिल्हा चंद्रपुर येथुन आनल्याचे सांगीतल्याने आरोपी ट्रक चालक कमांक १ याचे ताब्यातुन १) पांढरी ओली रेती ९ ब्रास (९०० फुट) किंमत ९०,०००/-रु, २) एक टाटा कंम्पनीचा १४ चक्का ट्रक कमांक एम.एच. ३४ बी. दोड. ३६३५ किंमत २०,००,०००/- रु असा एकुण जु. किंमत २०,९०,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन ट्रक चालक व मालक यांचे विरुध्द पोलीस स्टेशन सेलु येथे अप. क्र. ८१९/२०२५ कलम ३०३(२), ३(२) वि.एन.एस. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
-सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस अंमलदार चंद्रकांत बुरंगे, भुषन निघोट, अमोल नगराळे, मंगेश चावरे, सर्व नेमणुक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.