Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गांजाची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना हिंगणघाट पोलिसांनी घेतले ताब्यात

आरोपीविरूध्द एन.डी.पी.एस. कायदयान्वे गुन्हा नेांद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा- जिल्ह्यातील हिंगणघाट तहसील मध्ये हिंगणघाट पोलीस स्टेशन अंतर्गत दि. 05.08.2024 रोजी मुखबीरकडुन मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पो.नि. मनोज गभणे पोलीस स्टेशन हिंगणघाट यांच्या आदेशाने पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरण पथकाने भिमगनर वार्ड येथील पाणी फिल्टर प्लाँन्ट जवळ कलश लांबट व त्याचा साथीदार बादल भटे हे दोघेजन गांजा बाळगुण चोरटी विक्री करीत असतात व सध्या त्यांचे जवळ गांजा आहे या माहीती वरून कलश दिपकराव लांबट वय 23 वर्ष रा. सेंट्रल वार्ड हिंगणघाट व एक विधी संघर्षित बालक यांचेवर गांजा बाबत रेड केला असता त्याचे ताब्यामध्ये ओलसर 1) गांजा वजन 1.073 किलो ज्याचे अंदाजे बाजार मुल्य 40,000/- रु. 2) एक रियल्मी कंपनीचा अॅंन्ड्राईड मोबाईल अं. किं. 6,000 /- रू. 3) ओपो कंपनीचा अॅंन्ड्राईड मोबाईल अं. किं. 8,000/- रू. असा एकुण जु.किं. 54,000/- रू. चा माल मिळुन आल्याने सदरचा गांजा मौका जप्त पंचनामा कारवाई प्रमाणे जप्त करून नमुद आरोपीविरूध्द एन.डी.पी.एस. कायदयान्वे गुन्हा नेांद करून तपासात घेतला.सदरची कारवाई नुरूल हसन पोलीस अधिक्षक वर्धा डाँ. सागर कवडे .

अपर पोलीस अधिक्षक वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी रोषण पंडीत हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात मनोज गभणे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देषानुसार, स.पो.नि. अनिल आळंदे, पो.उपनि सतिश जायभाये, गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो. हवा. प्रविण देशमुख, सुनिल मळणकर, पो. ना. नितीन ताराचंदी, नरेंद्र आरेकर, सुनिल मेंढे पो.शि. विजय हारनुर, निलेश नगराळे यांनी केली आहे. पुढील तपास पो.उपनि होमकांत मशाखेत्री करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये