Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,सावली येथे मतदार जनजागृती कार्यक्रम साजरा.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

राष्ट्रीय सेवा योजना व महसुल विभाग सावली तर्फे दिनांक 07 आॅगस्ट 2024 रोजी मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री अनमोल कांबळे, नायब तहसिलदार,सावली हे होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.ए.चंद्रमौली उपस्थित होते. कांबळे सर यांनी विद्याथ्र्यांना शासनाच्या करिअर संबंधीत विविध योजनांची माहिती दिली तसेच शैक्षणिक सुविधांसाठी लागणारे दस्तावेज आॅनलाईन कसे काढावेत ही माहिती दिली.

 प्राचार्य डाॅ.ए.चंद्रमौली सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी विद्यार्थी सहभागाचे महत्व सांगितले.

 प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.देविलाल वताखेरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डाॅ. राम वासेकर आणि आाभार रासेयो कार्यक्रम अधिकारी डाॅ. राजश्री मार्कंडेवार यांनी केले. या कार्यक्रमास सुमारे 120 नविन मतदार नोंदणी झाली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये