Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यशासाठी कठोर परिश्रम गरजेचे – संजय ठावरी

स्टुडन्ट फोरम ग्रुप तर्फे सत्कार समारंभ 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना – कुठल्याही क्षेत्रात नेत्रदीपक यश प्राप्त करायचे असल्यास जिद्द ,चिकाटी सोबतच कठोर परिश्रम घेणे आवश्यक आहे. यातूनच यशाचा खरा मार्ग गवसला जातो असे मत वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संजय ठावरी यांनी स्टुडन्ट फोरम ग्रुप कोरपना तर्फे आयोजित विविध पदावर नियुक्ती झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले.

याप्रसंगी मेजर बंडू कुमरे, प्रियाताई खाडे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितानी मार्गदर्शन केले. सत्कार सोहळयात पोलीस उपनिरीक्षक पदी वर्णी लागलेल्या नंदकिशोर लाहेवार, जलसंपदा विभाग कालवा निरीक्षक पदी नियुक्त झालेल्या अतुल जौन्जाल, महाराष्ट्र पोलीस मध्ये सुषमा खाडे, एस आर पी एफ मध्ये नियुक्ती मिळालेल्या हरिदास बांदुरकर, आदित्य वेलादी यांचा सत्कार करण्यात आला.त्यांनी ही याप्रसंगी त्यांची यश कथा उपस्थितांपुढे मांडली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतीक बोरडे, संचालन भूषण बोबडे तर आभार कलीम सय्यद यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने स्टुडन्ट फोरम ग्रुपचे सदस्य व कोरपना नगरवासीय यांचे उपस्थिती होती. तसेच याप्रसंगी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे नागरिकांकडूनही अभिनंदन करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये