ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पल्लेझरीत डायरियाने महिलेचा मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या पल्लेझरीत मागिल काही दिवसांपासून डायरीयाची साथ सुरू झाली असून गावातील नागरीक आजाराने बेजार झाले आहेत.अशातच पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेऊन परत आलेल्या मनिषा पगू सिडाम(२२) या विवाहित महिलेचा शुक्रवारी सायंकाळी ८.३० च्या दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

तर भिमराव सिडाम,व बळीराम देवकते या दोघांवर चंद्रपुरात उपचार सुरू आहते तर काही जण सोयीच्या ठिकाणी उपचार घेत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली असून गावात आरोग्य शिबीर आयोजित करून उपचार करण्याची मागणी केली जात आहे.

    मृत्यक मनिषा सिडाम हिला संडास,उलटीचा त्रास होत असल्याने अस्वस्थ झाली होती.प्रकृतीत अधिक बिघाड होत असल्याने नातेवाईकांना घेऊन पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले आणि परत घरी आली मात्र संध्याकाळी अचानक तब्येतीत बिघाड होऊन तिचा मृत्यू झाला.मृत्यक महिलेला एक सहा महिन्यांची मुलगी असल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.मागिल पंधरवाड्यापासून सर्वत्र पावसाची रिपरिप सुरूच असल्याने भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होत असल्याने जलस्रोत दुषित होत असतात आणि काही जण घरापासून शेती लांब अंतरावर असल्याने शेतातच चर खोदून दुषित पाणी पिण्यास वापरतात अशा विविध कारणांमुळे विविध आजारांची साथ पसरली जाते त्यामुळे पावसाळ्यात नागरीकांनी निर्जंतुकीकरण केलेलं पाणी पिण्यास वापर करण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातून मिळत असतानाही नागरिक दुषित पाणी पिण्यास वापरतात त्यामुळे विविध आजाराला निमंत्रण देत असतात त्यामुळे आजारी पडण्याचे प्रकार पावसाळ्यात वाढतात.अशाच काही प्रकारामुळे पल्लेझरीत डायरिया आजाराची लागण झाल्याचे सांगितले जात आहे.वैद्यकिय विभागाने या गंभिर बाबीकडे विशेष लक्ष देऊन पल्लेझरीत आरोग्य शिबीर आयोजित करून आजारांवर वेळिच नियंत्रण आणणे गरजेचे आहे अन्यथा अजूनही रूग्णसंखेत वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे गावकरी सांगत आहेत.

    जिवती,पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमितपणे औषध साठा पुरवठा केला जात नाही,त्यामुळे प्राथमिक उपचार असो किंवा सिरियस रूग्ण असो त्यांना रेफर करण्याची एक प्रकारे किडच लागल्याचे बोलले जात आहे.मागिल वर्षभरापासून जिवती आणि पाटण आरोग्य केंद्रात बाळंतपण महिला किंवा गर्भवती महिलांचे रक्त तपासणी किटच उपलब्ध नसल्याची बोंब सुरू आहे.अशा विविध कारणांमुळे बाळंतपणासाठी आलेल्या महिलेला रेफर करतात नार्मल बाळंतपण होणाऱ्या महिलेचाही सिझर करून मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करायला लावत असल्याचे बोलले जात आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये