कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनो नोंदणी करा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना-जिवती तालुक्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस विक्री करिता आधार बेस नोंदणी सुलभकरण्यासाठी कापूस किसान अॅप विकसित करण्यात आले आहे.
भारतीय कापूस निगम लिमिटेड द्वारे नजीकच्या काही दिवसात कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे. सदर नोंदणी कालावधी अंतिम टप्प्यात आला आहे. ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंतच्या कालावधीत या अॅपद्वारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या मोबाइलमध्ये कापूस किसान अॅप डाऊनलोड करावा. त्यावर दिलेल्या प्रमाणे नोंदणी करावी. यासाठी चालू वर्षातील सातबारा पीक पेरा, आधार कार्ड, एक पासपोर्ट बैंक पासबुक, मोबाइल क्रमांक आदी बाबतची माहिती नोंदणी करावी.
तसेच अॅप मध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे व माहिती अचूकपणे भरावी लागणार आहे, अशी माहिती बाजार समिती सभापती अशोक बावणे, उपसभापती वंदना बल्की, सचिव कवडू देरकर यांनी दिली आहे. काही अडचण आल्यास बाजार समिति यांना कळवावे



