ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिस दल, सी.आय.एस.एफ. व होमगार्ड सैनिक यांचे संयुक्त पथसंचलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 12/04/2024 रोजी पोलीस स्टेशन वर्धा शहर कडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीरामनवमी व आगामी लोकसभा निवडणूक संबंधाने वर्धा शहरातील मुख्य मार्गावरून पोलीस निरीक्षक पराग पोटे यांचे मार्गदर्शनात पोलिस दल, सी.आय.एस.एफ. व होमगार्ड सैनिक यांचे संयुक्त पथसंचलन काढण्यात आले.

पथसंचलनामध्येे 02 पोलिस निरीक्षक 03 पो.उपनिरीक्षक,25 पोलीस अंमलदार महीला व पुरुष, 66 सी.आय.एस.एफ जवान तसेच 15 होमगार्ड सैनिक व तिन पोलिस वाहने समाविष्ट झाली होती.

बजाज चौक, निर्मल बेकरी चौक, सोशालिस्ट चौक, कपडा लाईन , सराफा लाईन, गोल बाजार, सरदार पटेल चौक, ईतवारा चौक, ईतवारा पोलिस चौकी, सरकारी दवाखाना, बस स्थानक यामार्गे पथसंचलन करण्यात आले.

 

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये