ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मंदिरातील हनुमान मुर्तीचे अपहरण – हिंदु समाजात आक्रोश

ह्यापूर्वीही झाली ह्याच मंदिरातील मुर्तीची विटंबना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

मुन्ना खेडकर

बल्लारपूर -चंद्रपूर मुख्य मार्गावरील सैनिक शाळेजवळील भिवकुंड नाल्याच्या किनाऱ्यावर असलेल्या मंदिरातील हनुमानाची मुर्ती समाजकंटकांनी चोरून नेली असुन ऐन शनिवारी ही घटना उघडकीस आल्याने भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असुन सदर प्रकार करणाऱ्या विकृत व्यक्तीचा शोध घेऊन कडक कारवाई करावी ह्या मागणीसाठी भाविकांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन करून चक्का जाम केला.

या पूर्वीही ह्याच मंदिरातील हनुमान मूर्तीची तोडफोड करून समाजकंटकांने विटंबना केली होती त्या वेळेस बल्लारपूर पोलिसानी एका व्यक्तीला ताब्यात घेतले होते मात्र तो व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे कळले होते.

सदर घटनेची माहिती कळताच बजरंग दल, विश्व हिंदु परिषदेसह हिंदु समाज बांधवांनी मंदिराकडे धाव घेऊन चक्का जाम करून विकृत मनोवृत्तीचा धिक्कार केला. हा प्रकार कळताच पोलीस निरीक्षक सुनील गाडे ह्यांचेसह बल्लारपूर पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली व गुन्हेगाराला लवकरात लवकर ताब्यात घेण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात पोलिसांना यश मिळाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये